धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड गावात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या एकावर धरणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त केली आहे या प्रकरणी शुक्रवारी 6 जून रोजी रात्री 11 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वराड गावांमध्ये संशयित आरोपी राहुल यशराय हा हातात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने शुक्रवारी 6 जून रोजी सायंकाळी 7 वाजता कारवाई करत संशयित आरोपी राहुल आधार यशराय (रा. वराड ता. धरणगाव) याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त केले आहे. आणि त्याला अटक केली आहे. दरम्यान या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल भरत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राहुल यशराय याच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेश नाईक हे करीत आहे.