जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत जामनेर येथे तालुकास्तरीय तक्रार निवारण सभा घेण्यात आली. या सभेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी सर्वसामान्य जनतेच्या विविध तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्या तात्काळ सोडवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यासोबतच, त्यांनी विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या कामांचा सखोल आढावा घेतला. रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भाऊसाहेब अकलांडे, शिक्षण अधिकारी विकास पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, ज्यामुळे प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल.