यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावलचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांचे आज पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
यावल नगर परिषदचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शंशाकदादा प्रभाकर देशपांडे वय६४ वर्ष यांचे दिनांक ३१ मे २०२५ रोजी सकाळी ४ वाजता अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. शशांकदादा यांची अंत्ययात्रा त्यांच्या नगर परिषद मार्ग, कोर्ट रोड या निवासस्थानाहुन दुपारी ३ वाजता निघेल,शशांकदादा देशपांडे हे २००१ या काळात यावल नगर परिषदचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन निवड्रन आले होते. त्यांच्या कार्यकाळात अत्यंत गंभीर बनलेला शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला होता यावल नगरीचे शिल्पकार म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
नगर परिषदची नवीन सुसज्ज इमारत ही त्यांच्याच कार्यकाळात बांधण्यात आली होती.त्यांच्या पश्चात भाऊ सुन, नांतवंडे असुन, निरामय हॉस्पीटलचे संचालक डॉ .शंतनु देशपांडे यांचे ते काका होत.