जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रजापत नगरातील मोकळ्या जागेत अवैधपणे गांजाचे सेवन करणाऱ्या एकावर धरणगाव पोलीसांनी शनिवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता कारवाई केली आहे. त्याच्याकडून गांजाचे साहित्य आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रजापत नगरातील मोकळ्या जागेत काही जण अवैधपणे चिलममध्ये गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता संशयित आरोपी विनोद श्रीराम सुर्यवंशी वय ४४ रा. मितवा हॉटेल, प्रजापत नगर, जळगाव कारवाई करत चिलममध्ये गांजा ओढतांना आढळून आला आहे. त्यानुसार पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद सुर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश चिंचोरे हे करीत आहे.