जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळा फाट्याजवळ बुधवारी १२ जून रोजी सायंकाळी भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रविवारी १५ जून रोजी दुपारी ३ वाजता ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद समाधान पाटील (वय ४०, रा. उमाळे, ता. जळगाव) मयत दुचाकीस्वार तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पाटील हा उमाळे गावात आपल्या आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. शेती करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी, ११ जून रोजी शरद शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. सायंकाळी शेतातून दुचाकी क्रमांक (एमएच १९ एबी ३९१२)ने घरी परतत असताना जळगाव-जामनेर रस्त्यावरील उमाळे फाट्याजवळ ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईपी १७३८) ने दुचाकीला कट मारल्याने शरद हा रस्त्यावर पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी रविवारी १५ जून रोजी दुपारी ३ वाजता ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.