मुंबई- वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पहिलीपासून हिंदीचे शिक्षण अनिवार्य करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध करत या विरोधात संघर्ष करण्याची भूमिका जाहीर केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात ते काही तरी महत्वाची घोषणा करतील असे मानले जात होते. यात त्यांनी हिंदीला विरोधाची भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की मी दोन पत्र काढली आहेत. उजळणी म्हणून पुन्हा ते पत्र वाचत आहे. 17 एप्रिलच पाहिलं पत्र हिंदी सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही. आम्ही पहिली पासून का शिकायची? सरकार हिंदी भाषा थोपवू पाहत असेल तर मनसे हे खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, राज ठाकरे पुढे म्हराले की, मनसे महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नाही. हिंदी पुस्तक विकू देणार नाही. प्रत्येक राज्यात त्या ठिकाणी असलेल्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे. ते होणार नसेल तर संघर्ष अटळ आहे. मोदींच्या गुजरातमध्ये देखील हिंदीची सक्ती नसल्याचे राज यांनी याप्रसंगी सांगितले. उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
याप्रसंगी राज ठाकरे यांनी सरकारला इशारा देखील दिला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजाव.