जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक शुक्रवार दिनांक 20 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा निश्चीत झालेला आहे. या दौऱ्याचा संपूर्ण तपशील अधिकृतपणे समोर आलेला नसला तरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगाव येथील ख्वाजाजी नाईक स्मारकाचे लोकार्पण व बालकवि स्मारकाचे भूमिपुजन होणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते वरणगाव येथील राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत राज्यातील मातब्बर मंत्री देखील जिल्हा दौऱ्यावर त्यांच्या सोबत असणार आहे. तर फडणवीस हे सभा वा मेळाव्याला संबोधित करण्याची शक्यता देखील आहे. त्यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणच्या मान्यवरांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश देखील होऊ शकतो. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याबाबत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे दौऱ्याचा तपशील लवकरच समोर येण्याचे संकेत देखील मिळाले आहेत.