जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाच्या सभागृहात एका शानदार ‘संगीत संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आऊ तोरे चरण कमल’ या गीतापासून सुरू झालेली ही मैफल हार्मोनियम आणि तबलावादनाच्या सुमधुर जुळवणीमुळे उत्तरोत्तर बहरत गेली आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरीआई पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकीताई पाटील यांची उपस्थिती होती. गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या पथजा नेवे, कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा, प्रवीण महाजन, देवेंद्र गुरव, सुशील महाजन, केंद्र व्यवस्थापक राजू पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध कला प्रकारांचे सादरीकरण
कार्यक्रमाची सुरुवात गायन विभागाच्या विद्यार्थ्यांनी राग भूपाळीतील सरगम गीत व छोटा ख्याल सादर करून केली, यात तुलसी महाजन, अथर्व पाटील, वीरा चौधरी, वैदेही राजपूत, धनश्री जोशी, डेलीना अत्तरदे यांचा समावेश होता. नाजनीन शेख यांनी ‘ज्योती कलश छलके’, तर निकिता जोशी यांनी ‘आऊ तोरे चरण कमल’ हे गीत सादर केले. सौ. अलका खैरनार, सौ. राजश्री पाठक, सौ. मनीषा डेकाटे यांनी ‘देहाची तिजोरी’ हे भक्ती गीत सादर केले, तर ऋतुराज जोशी यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग गायला. कथक विभागातील रिया वर्मा, समृद्धी जोशी, लावण्या डहाड यांनी ‘गरज गरज आज मेघा’ या गीतावर बहारदार नृत्य सादर केले.
तबला विभागाच्या कृणाल गजाकुश व सार्थक महाजन यांनी त्रिताल तबला वादनातील विविध प्रकार सादर केले. गायन विभागाच्या समीक्षा माकोडे, अर्चना गजाकुश, हिमानी सोनार यांनी ‘पंख होते तो उड आती रे’, ‘सायो नारा सायो नारा’, ‘चंदा है तू मेरा सूरज है तू’, ‘दिल दिवाना बिन सजना के’ ही सोलो गीते सादर केली. समीक्षा माकोडे, नाजनीन शेख, ऋतुराज जोशी यांनी ‘ॐ नमः शिवाय’ हे गीत गायले. कार्यक्रमाची सांगता गायन विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सामूहिकपणे सादर करून केली.
सहकार्य आणि आभार प्रदर्शन
कार्यक्रमास तबला/ढोलकवर प्रवीण महाजन, ऑक्टोपॅडवर देवेंद्र गुरव तर सिंथेसायझरवर सुशील महाजन यांनी साथसंगत केली. डॉ. महिमा मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि संध्या फासे यांनी सुरेल सूत्रसंचालन केले. भूषण खैरनार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक राजू पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, ईश्वर पाटील यांनी सहकार्य केले.