जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कामानिमित्त चोपडा येथे सासऱ्यांकडे गेलेल्या अनिल डेविड फिलीप (वय ४०, रा. पिंप्राळा) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ४० हजार रुपये व रेनकोट चोरून नेला. ही घटना १५ ते १७ मे दरम्यान पिंप्राळ्यात घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ६ जून रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी नोकरी करणारे अनिल फिलीप हे १५ मे रोजी चोपडा येथे सासऱ्यांकडे गेले होते. त्या वेळी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोख ४० हजार रुपये व एक हजार रुपये किमतीचा रेनकोट असा एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. १७ मे रोजी फिलीप हे घरी आले त्या वेळी घटना लक्षात आली.
या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.