जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कासमवाडी येथील आठवडे बाजारातून एका महिलेच्या गळ्यातील ७३ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना शनिवारी ७ जून रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी ८ जून रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील महाबळ येथील रहिवाशी येथील जयश्री संजय धरम वय ३० या महिला शनिवारी ७ जून रोजी कासमवाडी येथील आठवडे बाजारात रात्री ८ वाजता खरेदी करण्यासाठी आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७३ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.