जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापुरा भागातील परिसरात राहणाऱ्या एका तरुणीच्या घरात घुसून अश्लिल चाळे करून धमकी देत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी १५ जून रोजी दुपारी १ वाजता समोर आला आहे. या संदर्भात रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील एका भागातील २० वर्षीय तरुणी ही वास्तव्याला आहे. दरम्यान रविवारी १५ जून रोजी दुपारी एक वाजता पीडित तरुणी ही घरी असताना या परिसरात राहणारा नाझीर (पूर्ण नाव माहित नाही) हा तरुणीच्या घरात घुसून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता नाजीर पूर्ण नाव माहित नाही. याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.