अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील झाडी गावाजवळ गुरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकावार मारवड पोलीसांनी मंगळवार १७ जून रोजी सकाळी ६ वाजता कारवाई केली आहे. पोलीसांनी तीन गुरांची सुटका केली असून वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील झाडी गावाजवळून वाहनातून गुरांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मारवड पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मंगळवारी १७ जून रोजी सकाळी ६ वाजता कारवाई करत वाहन क्रमांक (एमएच ४१ जी २६६०) वाहन थांबवून चालक मस्तफा करीम कुरेशी रा. बेटावद ता. शिंदखेडा यांला वाहतूकीबाबत विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता वाहनात तीन गुरांना निर्दयतेने बांधलेले दिसून आले. याप्रकरणी संग्राम शामसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात चालक मस्तफा करीम कुरेशी रा. बेटावद ता. शिंदखेडा यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.