जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील गेंदालाल मील परिसरात अवैधपणे प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या दोन जणांविरोधात जळगाव शहर पोलीसांनी सोमवारी ९ जून रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत एकाला अटक केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरात अवैधपणे प्राण्यांची कत्तल करून त्यांची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. सोमवारी ९ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहर पोलीसांनी कारवाई केली. यावेळी संशयित आरोपी शेख रिहान शफिक उल रहमान वय २२ रा. मासुमवाडी जळगाव आणि लुकयाबी रशिद खान वय ५५ रा. गेंदालाल मील, जळगाव हे दोघेजण अवैधपणे गोमांस विक्री करत असल्याचे मिळून आले. पोलीसांनी कारवाईत एकुण २५ किलो प्राण्यांचे मांस आणि चाकू, कुऱ्हाड साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोहेकॉ रविंद्र कापडणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख रिहान शफिक उल रहमान वय २२ रा. मासुमवाडी जळगाव आणि लुकयाबी रशिद खान वय ५५ रा. गेंदालाल मील, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ओमप्रकाश सोनी करत आहे.ए