जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार विकास अमृतकर नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास प्रभात चौकातील उड्डाणपुलावर घडली. जखमीवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरातील शिवकॉलनीकडून आकाशवाणी चौकाकडे (एमएच ४१, झेड ९९११) क्रमांकाच्या दुचाकीवन विकास अमृतकर जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीस्वार विकास अमृतकर हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जखमी अमृतकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्याावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.