यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अंतर्गत तळोदा ते बऱ्हानपुर रस्त्याचे चौपदरीकरणा साठी तसेच शहरा बाहेरील बाह्य वळणाचे साठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भुसंपादनाच्या पार्श्वभूमीवर यावल शहराच्या बाहेरून जात असलेल्या बायपास रस्त्याचे साठी जमीन भूसंपादनास यावल येथील शेतकऱ्यांचाही प्रचंड विरोध असल्याचे निवेदन येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना शेतकऱ्यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ३ जून रोजी फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात, केन्द्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत तळोदा – बऱ्हानपुर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे संदर्भात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी बाबत व मोबदल्याबाबत आपले कार्यालया कडून सविस्तर माहिती देण्यात आली. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचेच मध्यभागापासून दोन्ही बाजूकडून रुंदीकरण केल्यास त्यास आवश्यक लागणारी जमीन शेतकरी देण्यास तयार आहेत. मात्र शहराबाहेरील अस्तित्वातील रस्त्याच्या दक्षिण बाजू कडून वळविण्यात येत असलेल्या बाह्य रस्त्याकरीता लागणारी जमीन भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध आहे. दक्षिण भागातील जमीन काळीभोर असून उच्च प्रतीची आहे .तसेच या जमिनीत शेतकरी दोन ते तीन पिके घेतात बऱ्याच शेतकऱ्यांचे जमिनीचे तुकडे पडणार असल्याने शेतकरी तीव्र नाराज आहेत.
यात पुढे म्हटले आहे की, सध्या असलेल्या रस्त्याचेच रुंदीकरण केल्यास अत्यंत कमी जमिनीचे भूसंपादन होणार असून बाह्य रस्ता बांधावयाच्या खर्चापेक्षा उड्डाणपूलांचा खर्च कमी येईल असेही निवेदनात म्हटले आहे. यावल येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पासून ते वनविभागापर्यंत च्या रस्त्याचीअस्तित्वात असलेली रुंदी ही रस्त्याचे रूंदीकरणासाठी रूंदीकरणासाठी आणि रस्त्याचे दोन्ही बाजूस बहुतांश शासकीय जमीन आहे. शहरातून उड्डाण रस्ता करण्यास अडचण निर्माण झाल्यास रस्त्याचे कडेस असलेले अतिक्रमण काढून रुंदीकरण करता येतो असे ही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर पुनीत महाजन प्रकाश चोपडे , दिलीप चोपडे ,रवींद्र बोरोले, सौ.जयश्री बोरोले,पुरुषोत्तम देशमुख, सुरेश कुरकुरे,सौ.अलका चौधरी,सौ.सुनिता बाऊस्कर,बालाजी कुरकुरे , जयवंत देशमुख,देवराम राणे कृष्णा राणे, किशोर राणे,सौ.मीनाक्षी फेगडे, मोहन तळेले,सौ.अलका फालक, यांचे सह सुमारे दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.