जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथे कारण नसतांना तरूणासह त्याचे वडील यांना शिवीगाळ करत लोखंडी कळ्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी १४ जून रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी १५ जून रोजी मध्यरात्री ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजित भगवान सपकाळे वय १९ रा. कानळदा ता.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १४ जून रोजी रात्री ९ वाजता किरकोळ कारणावरून त्यांचे वडील भगवान सुनिल सपकाळे यांना गावात राहणारे दादू शांताराम कोळी आणि शांतराम बापुराव कोळी यांनी शिवीगाळ मारहाण केली. वडीलांना मारहाण करत असल्याचे पाहून अभिजित हा भांडण सोडविण्यासाठी गेला त्याला देखील दोघांनी लोखंडी कळ्याने डोक्यावर व पाठीवर मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी अभिजित सपकाळे याने पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणारे दादू शांताराम कोळी आणि शांतराम बापुराव कोळी दोन्ही राहणार कानळदा ता.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास इंगळे हे करीत आहे.