धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शनिवारी ७ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी साडेतीन वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात बकरी ईदच्या दिवशी शनिवारी ७ जून रोजी सकाळी ११ वाजता काही तरूणांच्या दोनगटात वाद निर्माण झाला. त्यावेळी पोलीसांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतू “तुम पोलीस वाले हमारे बिच मत बोले, हम हमारा देख लेंगे” असे बोलून बेकायदेशीरित्या मंडळी जमा करून दोन गटात हाणामारी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश सुर्यवंशी यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुपारी साडेतीन वाजता झेंबाझोंबी करणारे परवेज खान असलम खान, साहिल खान असलम खान, जुबेर बिलाल कुरेशी रा. बागवान गल्ली नंदुरबार, जावेद खान सुलतान खान, मास खान अमजद खान, फैजान खान अमजद खान, अजर अजगर खान कुरेशी, मुश्ताख शेख मुख्तार शेख सर्व रा. पाळधी ता.धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप खंडारे हे करीत आहे.