भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील शारदा कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी बोदवड येथे हॉस्पिटल आणि मेडीकल दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून १५ लाख रूपये आणावे अशी मागणी करून मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केल्याची प्रकार समोर आला आहे, याप्रकरणी मंगळवारी १७ जून रोजी रात्री ११ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील शारदा कॉलनी येथील माहेर असलेल्या लिना आश्विन कळसकर वय २४ याचा विवाह बोदवड येथील डॉ.आश्विन संजय कळसकर यांच्याशी यांच्याशी झालेला आहे. दरम्यान हॉस्पीटल आणि मेडीकल दुकान सुरू करण्यासाठी माहेराहून १५ लाख रूपये आणावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही या रागातून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून दुखापत केली. तसेच घटस्फोट देण्याची धमकी दिली.
दरम्यान या छळाला आणि त्रासाला कंटाळून विवाहिता लिना कळसकर ह्या माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती डॉ. आश्विन संजय कळसकर, सासरे संजय श्रावण कळसकर, सासू छाया संजय कळसकर, नणंद सपना संजय कळसकर सर्व राहणार बोदवड यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता लेले हे करीत आहे.