पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे एका अनोळखी अंदाजे ३० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ जून रोजी एका अनोळखी अंदोज ३० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पहूर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पहूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान मयताची ओळख पटलेली नाही. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटवावी असे आवाहन पहूर पोलीसांनी केले आहे.