जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेस फंडाचा योग्य आणि प्रभावी उपयोग करत, शहरातील विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक अत्याधुनिक आणि सुविधा संपन्न अभ्यासिका नुकतीच सुरु करण्यात आली आहे. या अभ्यासिकेच्या उभारणीसाठी 20 लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही अभ्यासिका एक मौल्यवान साधन ठरणार आहे.
अभ्यासिकेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये:
वातानुकुलीत आणि सुसज्ज बैठकव्यवस्था, 24×7 वीज आणि प्रशस्त प्रकाश व्यवस्था, 60 विद्यार्थ्यांपर्यंत बसण्याची क्षमता, शहराच्या मध्यवर्ती आणि सहज उपलब्ध ठिकाणी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, प्रेरणादायी वातावरण व सुव्यवस्थित अभ्यास जागा
ही अभ्यासिका मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, “अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा आणि आपल्या यशाची दिशा निश्चित करावी.”
जिल्हा परिषदेचा हा उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी योग्य आणि शांत अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देतो. अभ्यास करण्याची जागा ही प्रत्येक विद्यार्थ्याची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्याचा हा एक सकारात्मक टप्पा आहे.