पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पारोळा नगर परिषदेमार्फत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या वेळी बचत गटांनी पर्यावरणाच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने उचलली.
या कार्यक्रमाला नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक यामिनी लक्ष्मणराव जटे, लेखापाल दीपक महाजन, अंतर्गत लेखापरीक्षक सार्थक मोरस्कर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तथा अमृत २.० नोडल अधिकारी चंद्रकांत महाजन, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा संजय गीते, स्वच्छता निरीक्षक दीपक चौधरी, शहर समन्वयक शुभम कंखरे, अक्षय सोनवणे, समूह समन्वयक राहुल प्रजापती, मुकादम सिद्धार्थ इंगळे आणि मुकादम मोतीलाल उर्फ संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भागीरथी महिला शहर स्तर संघाच्या अध्यक्ष मनीषा चौधरी, उपाध्यक्ष अर्चना पाटील, व्यवस्थापक नूतन आनंद पाटील, शालिनी जैन, कविता वाणी, शोभा माळी यांच्यासह अनेक बचत गट सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या प्रसंगी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपण सर्वानी मिळून उचलली पाहिजे, असा संदेश यावेळी देण्यात आला. बचत गटांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे स्थानिक पातळीवर पर्यावरण जागृतीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.