जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वराड गावात शेतीचा ताबा सोड असे सांगितल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यासह त्यांच्या शालकाला दोन जणांनी शिवीगाळ करत हातात कुऱ्हाड घेवून डोक्यात मारहाण करून दुखापत केल्याची घटना १२ जून रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी १६ जून रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगन लालसिंग राठोड (वय ५० रा. सुभाषवाडी ता. जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १२ जून रोजी जगन राठोड हे त्यांची पत्नी, सासू, सासरे, साली व साडू यांना शेत दाखवत होते. पंडीत गगन चव्हाण आणि विकास पंडीत चव्हाण (दोन्ही रा. सुभाषवाडी ता.जळगाव) यांनी शेतात का आले असे सांगितले. त्यावर हे शेत माझे असून तुम्ही शेतीचा ताबा सोडा असे सांगितल्याचा राग आल्याने पंडीत चव्हाण आणि विकास चव्हाण यांनी जगन राठोड आणि त्याचे नातेवाईकांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी एकाने कुऱ्हाड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाकळे हे करीत आहे.