पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील २५ वर्षीय शेतकरी युवक मोहित जगतसिंग पाटील याचा १४ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. घटना गावाजवळील मोहित यांच्या शेतात घडली. घटनेची माहिती मिळताच गावातील दिपक राजपूत, बाला जामसिंग पाटील, भरत सूरसिंग पाटील, पंढरीनाथ पाटील, बाळासाहेब कुमावत, कोतवाल गणेश पाटील, पोलीस पाटील चंद्रशेखर पाटील, कैलास कुमावत, कैलास रायसिंग पाटील, प्रतिश पाटील, संदीप राजपूत, अशोक आबा पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहित यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉ. अक्षय सोनवणे यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. मयत मोहित याचे पश्चात आई, वडिल, एक बहिण असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व शांत स्वभावाचे मोहित याचे अकस्मात मृत्यूने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.