धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साकरे गावातील एका भागात ओट्यावर बसलेल्या काही महिलांना अश्लिल हावभाव करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना रविवारी १५ जून रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ जून रोजी मध्यरात्री दीड वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साकरे गावातील एका भागात काही महिला गावातील एका ओट्यावर रविवारी १५ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास बसून गप्पा मारत होते. त्यावेळी गावात राहणारा संशयित आरोपी रमेश उर्फ जिभाऊ आनंदा पाटील रा. साकरे ता.धरणगाव याने ओट्यावर बसलेल्या महिलांना अश्लिल हावभाव करून त्यांचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रमेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील हे करीत आहे.