एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पतीसह सासरच्या जांचाला कंटाळून एरंडोल येथील विवाहितेने राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी ५ जून रोजी समोर आले आहे. या संदर्भात पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आले आहे.
मनीषा सागर सोनार (वय ३५, रा. जेडीसीसी बँक जवळ, एरंडोल) असे मयत विवाहितेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा सोनार हिचा विवाह एरंडोल येथील सागर शामकांत सोनवणे यांच्याशी २०१८ मध्ये रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून वेळोवेळी तिच्या शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच सासू, जेठ आणि जेठाणी यांनी देखील मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता मनीषा यांनी गुरुवारी ५ जून रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी एरंडोल येथे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी सासरच्या मंडळींवर आरोप केला आहे. या संदर्भात मनोज पोतदार (रा. करवंद रोड शिरपूर धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सागर शामकांत सोनार, सासू मंगला शामकांत सोनार, जेठ गणेश श्यामकांत सोनार आणि जेठाणी सुषमा गणेश सोनार (सर्व रा. जेडीसीसी बँक जवळ एरंडोल) यांच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापैकी पती सागर सोनार याला अटक करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.