भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साकेगाव येथील वाघुर नदीच्या पुलावरून दुचाकीने जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुरुवार ५ जून रोजी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कारवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय वामन पाटील वय-४५, रा.मुक्ताईनगर असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील रहिवासी असलेले विजय पाटील हे २३ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगावकडून भुसावळकडे दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएच ४२४४) ने येत असताना साकेगाव नजीकच्या वाघूर पुलावरून ते जात होते. त्यावेळी मागून येणारे कार क्रमांक (एमएच ०६ बीयु ९९२१) ने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत विजय पाटील हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटने संदर्भात त्यांच्या शालक राहुल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कार वरील अज्ञात चालकावर गुरुवार ५ मे रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई हे करीत आहे.