भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गायत्री नगरातील व्यापाऱ्याचे गोडावून फोडून फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्ही असा एकुण ३५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी १६ जून रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ जून रोजी रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, नंदलाल मिलकीराम मकडीया वय ६२ रा. श्रीहरी नगर, भुसावळ यांचे गायश्री नगरात फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्हीचे गोडावून आहे. १५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ते सोमवारी १६ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या पुर्वी त्यांचे गोडावून बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी गोडावून फोडून फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्ही असा एकुण ३५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर नंदलाल मकडीया यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी १७ जून रोजी रात्री ९ वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल वाघ हे करीत आहे.