जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली गावाजवळ धावत्या रेल्वेतून तोल गेल्याने एका परप्रांतीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी १ जून रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरज कुमार रामचंद्र पंडीत (वय-२६) रा. फुजफ्फरपूर (बिहार) असे मयत परप्रांतीय तरूणाचे नाव आहे.
नशिराबाद पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सुरज कुमार पंडीत हा तरूण रविवारी १ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जळगाव ते मुजफ्फरपूर दरम्यान रेल्वेने प्रवास करत असतांना त्याचा धावत्या रेल्वेतून तोल गेल्याने तो खाली पडला. त्यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सोबत असलेल्या कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटविण्यात आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.