जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील धनश्री हॉटेल जवळ किरकोळ कारणावरून एकाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २ जून रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवीदास एकनाथ अस्वार (वय ५० रा. शिरसोली ता.जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देवीदास अस्वार हे शिरसोली रोडवरील धनश्री हॉटेलजवळ बसलेले असतांना कौतीक पांडू खडसे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन ज्ञानेश्वर खलसे दोन्ही राहणार शिरसोली ता.जळगाव यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. या मारहाणीत कौतीक यांच्या डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. याप्रकरणी रात्री ८.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे कौतीक पांडू खडसे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन ज्ञानेश्वर खलसे दोन्ही राहणार शिरसोली ता.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील हे करीत आहे.