जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आर.एल. चौफुली परिसरातील मंदिराजवळील मोकळ्या जागेत चिलममध्ये गांजा टाकून नशा करणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई कारवाई केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील आर.एल. चौफुलीवरील महादेव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत काही तरुण चिलम मध्ये गांजाच्या नशा करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी 6 जून रोजी सायंकाळी 7 वाजता कारवाई करत संशयित आरोपी अमन मुश्ताक पटेल (वय 20, रा. शिवाजीनगर हुडको जळगाव) याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून नशा करण्याचे गांजा आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.