भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडका रोडवर राहणाऱ्या एका वृध्दाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी १४ जून रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजाराम बळीराम राणे वय ७९ रा. खडका रोड, भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ४ जून ते ८ जून दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी खडकीची आसरी वाकवून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आला. यानंतर राजराम राणे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १४ जून रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर हे करीत आहे.