जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज सकाळी नशिराबाद जवळ रिक्षा उलटून झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून यातील तरूणाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
यासंदर्भातील माहिती अशी की, एमएच १९ बीजे ५४३१ क्रमांकाची रिक्षा ही प्रवाशांना भरून भुसावळहून नशिराबादकडे येत होती. हायवेवरून नशिराबाद शहराकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावरून ही रिक्षा जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक उलटली. यात यातील तीन प्रवासी जखमी झाले असून यातील एक तरूणासह महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
रिक्षा उलटताच येथून जाणाऱ्या प्रवाशांनी यातील जखमी झालेल्यांना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली. नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.