जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत औषधी विक्रेता जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ जून रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विजय जगन्नाथ वाणी वय ५८ रा. तामसवाडी ता.पारोळा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मेडीकल चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३१ मे रोजी रात्री ९ वाजता ते जळगाव येथून पारोळ्या दिशेने जाण्यासाठी आकाशवाणी चौकातील उड्डाण पुलावरून दुचाकी क्रमांक (एमएच ४१ झेड ९९११) ने निघाले. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला मागुन अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात विजय वाणी यांना खागसी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख ह्या करीत आहे.