जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ही पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी पद्धतीने भरली जाणार आहेत.
भरली जाणारी पदे खालीलप्रमाणे:
वसतिगृह अधीक्षिका: १ पद (स्त्री, मुलींचे वसतिगृह, जळगाव), पहारेकरी/कम एस्पायस: १ पद (पुरुष, मुलांचे वसतिगृह, जळगाव), सफाई कर्मचारी: १ पद (स्त्री, मुलींचे वसतिगृह, जळगाव), स्वयंपाकी: २ पदे (स्त्री, मुलींचे वसतिगृह, जळगाव)
सुरुवातीला ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरली जातील. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार केला जाईल, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रियेत माजी सैनिकांच्या पत्नी, वीरपत्नी आणि सामान्य महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह १० जून २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. अर्जासोबत आधारकार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, दोन फोटो आणि पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
निवड करण्याचे किंवा कोणताही अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार कार्यालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२५७–२२४१४१४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.