जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोहाडी रोडवरील खुपचंद टॉवर जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत करत महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना तोडून नुकसान केल्याची घटना शनिवारी ७ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी ८ जून रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील खुबचंद टॉवर परिसरामध्ये आनंद भगवान पवार वय-३० हे आपल्या पत्नी शितल पवार यांच्यासोबत वास्तव्य आहेत. दरम्यान शनिवारी ७ जून रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून या परिसरात राहणारे राजेंद्र पाटील, प्रशांत राजेंद्र पाटील, मीना राजेंद्र पाटील आणि उज्वला प्रशांत पाटील या चौघांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने आनंद पवार यांना मारहाण केली. तसेच शितल पाटील यांना शिवीगाळ करत त्यांना देखील चपटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शितल पवार यांच्या कानातील सोन्याचा दागिना पडून गहाळ झाला आहे. या संदर्भात आनंद पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ८ जून रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील करीत आहे.