जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातामुळे अहमदाबाद येथून जळगाव येथे येणारे विमान रद्द करण्यात आले आहे.
आज दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी अहमदाबाद येथून लंडन येथे निघालेले विमान हे विमानतळाच्या बाहेरच अपघातग्रस्त झाले. यात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच हे विमान इमारतीवर आदळल्यामुळे येथील काही प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सचा देखील मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. तर या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, आजच्या अपघातामुळे अहमदाबाद येथून जळगावकडे येणारे विमान हे रद्द करण्यात आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने जळगाव येथील विमानतळाचे डायरेक्टर हर्ष त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अहमदाबाद येथून येणारे विमान आज येणार नसल्याची माहिती दिली.