जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वराड खुर्द शिवारात शेतात येण्याच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या पतीसह मुलगा आणि भाचा यांना शिवीगाळ लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना गुरूवारी १२ जून रोजी घडली आहे. याप्रकरणी शनीवारी १४ जून रोजी रात्री १० वाजता सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील वराड खुर्द शिवारातील शेत गट क्रमांक ६ मध्ये सुशिलाबाई पंडीत चव्हाण वय ३५ रा. सुभाषवाडी, जळगाव यांचे मालकीचे शेत आहे. १२ जून रोजी शेतात येण्याच्या कारणावरून सुशिलाबाई यांच्या सह त्यांचे पती पंडी चव्हाण, मुलगा गोपाल चव्हाण आणि भाचा राजेश या चौघांना मांगीलाल शंकर चव्हाण, संदीप मांगिलाल चव्हाण, समाधान मांगीलाल चव्हाण तिघे रा. निंबोरा तांडा ता. पाचोरा, बबलु मदन चव्हाण, जगन लालू राठोड आणि गोलू जगन राठोड तिघे रा. सुभाष वाडी ता.जळगाव या सहा जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी शनिवारी १४ जून रोजी रात्री १० वाजता सुशिलाबाई चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांगीलाल शंकर चव्हाण, संदीप मांगिलाल चव्हाण, समाधान मांगीलाल चव्हाण तिघे रा. निंबोरा तांडा ता. पाचोरा, बबलु मदन चव्हाण, जगन लालू राठोड आणि गोलू जगन राठोड तिघे रा. सुभाष वाडी ता.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाकळे हे करीत आहे.