सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या ९७ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘हरित दिंडी’ या विशेष उपक्रमांतर्गत ९७ झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करण्यात आले. स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या ‘हिरवा सातपुडा’ या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेकडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
या ‘हिरवा सातपुडा’ संकल्पनेचा उद्देश केवळ निसर्ग आणि वन्यजीवांचे संवर्धन करणे एवढाच नाही, तर आदिवासी जीवन आणि संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधणे हा देखील आहे. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी आपले संपूर्ण आयुष्य भेदभावमुक्त समाज उभारण्यासाठी समर्पित केले. त्यांनी समाजातील विविध संस्कृतींचा आदर राखून, त्यांना एकत्र गुंफून, माणसांमध्ये ऐक्य आणि सलोखा निर्माण करण्याचे महान कार्य केले. त्यांचे हे विचार आणि कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील, असे उपस्थितांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक वनविभाग आणि यावल वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयोजकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, या उपक्रमाच्या अंमलबजावणीत ‘मधुस्नेह संस्था परिवार’ यांनी ‘लोकसेवक प्रतिष्ठान’ सोबत समन्वय साधून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले.
या प्रसंगी डॉ. राजेंद्र पाटील, लिलाधर शेठ चौधरी, किशोरकाका महाजन, शेखर पाटील, मा. हमीद तडवी, कामिल शेठ, राजू सवरने, संजू जमादार, योगेश पाटील, उस्मान तडवी, महेश महाजन, सुधाकर झोपे, मो. हकीम मो. याकुब, सुनील फिरके, नईम शेख, अनिल जंजाळे, रतन बारेला, किशोर चौधरी, सरफराज तडवी, लियाकत जमादार, लक्ष्मण मोपारी, संजय पवार, बबलू तडवी, संजय भालेराव, महेबूब जमादार, देविदास हडपे, यशवंत महाजन, भरत चौधरी, डिगंबर चौधरी, ललित चौधरी, अनिल तडवी, राजू चौधरी, अनिल महाजन, सुरज पाटील, राहुल पाटील, विजय कोळी, व्ही. आर. पाटील, आर. एल. चौधरी, उत्तम चव्हाण, रमेश झांबरे, रवींद्र कुमावत, नितीन भंगाळे, जितेंद्र पाटील, गोविंदा गुरुजी, अतुल महाजन, सुनील सपकाळे, विवेक महाजन, दिनेश पाटील आणि दिलीप चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिकच शोभा आणली.