चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे रात्री मोठा दरोडा पडला चोरट्यांनी घरातून ७.९ तोळे सोने व २० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास करून शिताफीने पसार झाले.
१० रोजी कुसुंबा गावात रात्री आठ ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान तुषार शामकांत पाटील ( परसी चौक कुसुंबे ) यांच्या घरातील मागच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील ७.९ तोळे सोने व सोन्याचे दागिने तसेच वीस हजार रुपये रोख रक्कम असे सात लाख छत्तीस हजार रुपयाचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. याचा घरचे व शेजाऱ्यांना थांगपत्ता न लागता चोरटे पसार झाले.
याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तुषार शामकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, पोलीस कॉन्स्टेबल सुनील कोळी, विनोद पवार स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील यांनी दिवसभर तपासाची कारवाई केली. श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक व फिंगर प्रिंटचे पथक यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे करीत आहेत.
श्वान पथकाने घोडगाव रस्त्याच्या गाव दरवाजा पर्यंत चोरट्यांचा माग दाखवला. तेथे असलेल्या नळावर त्यांनी हातपाय धुतले असावेत म्हणून पुढील चोरट्यांचा माग दाखवण्यात श्वानपथक अपयशी ठरले.