जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरणार येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाचोरा येथे सासरी माहेराहून १५ लाख रूपये आणावे तसेच वडीलांच्या मालमत्तेत हिस्सा माग असे सांगून शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ९ जून रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील बोरनार येथील माहेर असलेल्या मोहिनी श्रीकृष्ण चौधरी वय २१ यांचा विवाह पाचोरा येथील श्रीकृष्ण भरत चौधरी यांच्यासोबत रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितला किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरूवात केली. तसेच तुला घरात स्वयंपाक येत नाही, आईवडीलांनी वळण लावले नाही असे सांगून माहेराहून १५ लाख रूपये आणावे आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा माग असे सांगून पतीसह सासरच्या मंडळींनी शिवीगाळ व मारहाण करून छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्या माहेरी निघून आल्या. याबाबत त्यांनी सोमवारी ९ जून रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात पती श्रीकृष्ण भरत चौधरी, सासू कविता भरत चौधरी, सासरे भरत नारायण चौधरी, नणंद विद्या भरत चौधरी, चुलत सासू रसस्वती राजेंद्र चौधरी, चुलत सासरे राजेंद्र नारायण चौधरी यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे हे करीत आहे.