जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी धुळे येथे पाच लाखांची मागणी करत शिवीगाळ मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ जून रोजी रात्री ८.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील माहेर असलेल्या अक्षदा जयेश गुरव वय २४ यांचा विवाह धुळे येथील जयेश हेमंत गुरव याच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे काही महिने चांगले गेल्या नंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पतीने विवाहितेला माहेरहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही, या रागातून छळ करण्यात आला. तसेच सासू, सासरे, चुलत सासरे व इतरांनी देखील छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती जयेश गुरव, सासरे हेमंत मधुकर गुरव, सासू प्रतिभा हेमंत गुरव, चुलत सासरे भुषण मधुकर गुरव सर्व रा. धुळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील हे करीत आहे.