जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील यश लॉन येथे राहणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना ८ जून रोजी रात्री ९ वाजता समोर आली आहे. या संदर्भात मंगळवारी १० जून रोजी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील यश लॉन परिसरातील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबीयांसह वस्तव्याला आहे. दरम्यान रविवारी ८ जून रोजी रात्री ९ वाजता दूध घेऊन येते असे सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी हिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. दरम्यान पीडीत मुलगी ही परतली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतू तिच्या संदर्भात कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी जळगाव शहर पोलिसात धाव घेऊन खबर दिली त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भिला पाटील हे करीत आहे.