अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी असतांना घरात घुसून तिचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना रविवारी १ जून रोजी दुपारी दीड वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता मारवड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. रविवारी १ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरात एकटी असतांना संशयित आरोपी समीर अक्रम अली खान वय २२ रा.अमळनेर हा घरात घुसून तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तसेच कुणाला सांगितले तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितला. दरम्यान पिडीत मुलीच्या आईने मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी साडेसहा वाजता संशयित आरोपी समीर अक्रम अली खान याच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.