जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी
जामनेर येथे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची शिवसेना तालुकाप्रमुख भरत पवार यांच्या घरी सदिच्छा भेट. जामनेर येथे मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.संजय राठोड हे जामनेर येथे बंजारा समाज संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आले असता त्यांनी ॲड. भरत पवार शिवसेना तालुका प्रमुख जामनेर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
ना.संजय राठोड यांनी आपुलकीने स्वागत स्वीकारला . या प्रसंगी अँड भरत पवार शिवसेना तालुका प्रमुख जामनेर यांच्या परिवार, डॉ. तुषार राठोड, पितेश शर्मा , सुभाष जाधव, निलेश जाधव स्वीट सहाय्यक, धरम चव्हाण माजी पंचायत समिती सभापती, आत्मराम जाधव, अरुण पवार, मोरसिग राठोड, भरत राठोड बुलढाणा, रोहन राठोड , राजु राठोड, लता राठोड आणि अन्य बंजारा समाज बांधव उपस्थित होते.
जामनेर तालुक्यात भविष्यात शिवसेना पक्ष बांधणीत जास्तीत जास्त बंजारा समाजाच्या लोकांचा सहभाग वाढवा, येण्यारा पंचायत समिती, जिल्हा परिषद साठी जास्तीत जास्त बंजारा समाजातील लोक निवडून येण्यासाठी प्रयत्न करा संघटना बळ व पुढील वाटचालीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.