जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील रामेश्वर कॉलनी परिसरातील ‘सारा’ हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अपघात झाल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या सैय्यद सिराज रफिक (रा. रामेश्वर कॉलनी) आणि त्यांच्यासोबतच्या दोन महिलांनी रुग्णालयातील नर्स संध्या उज्वल सोनवणे (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्यासोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. एवढेच नाही, तर त्यांनी हॉस्पिटलमधील कर्मचारी वंदना देविदास सोनवणे यांनाही शिवीगाळ केली. या गोंधळात हॉस्पिटलमधील काच फुटून ती वंदना सोनवणे यांना लागल्याने त्या जखमी झाल्या, तर सैय्यद सिराज रफिक याने हॉस्पिटलचे दरवाजे तोडून नुकसान केले.
याच दरम्यान, हॉस्पिटलमधील अन्य कर्मचारी वंदना देविदास सोनवणे मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता, त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. या हाणामारी आणि गोंधळात हॉस्पिटलमधील काच फुटली आणि ती वंदना सोनवणे यांना लागून त्या जखमी झाल्या. सैय्यद सिराज रफिक याने रागाच्या भरात हॉस्पिटलचे दरवाजेही तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. नर्स संध्या सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सैय्यद सिराज रफिक आणि त्यांच्यासोबतच्या दोन महिलांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहेत.