नशिराबाद लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। नशिराबाद गावातील नीचवास मोहल्ला परिसरात अवैधपणे गुरांचे मांस विक्री करणाऱ्या दोन जणांवर नशिराबाद पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात रविवारी १ जून रोजी सकाळी १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नशिराबाद शहरातील नीचवास मोहल्यात अवैध पद्धतीने गुरांचे मांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. पथकाने रविवारी १ जून रोजी सकाळी १० वाजता कारवाई करत १५० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश खडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी शेख नईम शेख लुकमान कुरेशी, इम्रान शेख लुकमान शेख कुरेशी दोन्ही रा. नीचवास मोहल्ला, नशिराबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहे.