अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय आणि १५ वर्षीय अल्पवयीन मुली वास्तव्याला आहे. एका समाजाच्या असून १० जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या सुमारास पिडीत मुली ह्या घरी असतांना अज्ञात व्यक्तीने दोघांनी काहीतरी आमीष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलींच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहे.