यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – आगामी काळात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभुमीवर यावल तालुका शिवसेना (उबाठा )ची बैठक नवनियुक्त शिवसेना उपनेते तथा रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यावल येथे खरेदी विक्री संघा च्या सभागृहात संपन्न झाली.
बैठकीच्या सुरवातीला नवनियुक्त शिवसेना उप नेते व रावेर लोकसभा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा तसेच जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, युवासेनेचे चंद्रकांत शर्मा यांचा शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गुलाबराव वाघ यांनी उपस्थित शिवसैनिकांना व पदाधिकारी यांना पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन केले. शेतकरी व नागरिक यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्यात.
प्रत्येक शिवसेनिकांने जनतेत मिळून मिसळून त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी शिवसेनिकांना यावेळी बैठकीत केले. बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले तर बैठकीस उपजिल्हा प्रमुख गोपाळ चौधरी, तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे उप तालुका प्रमुख शरद कोळी,डी एम पाटील, किरण साळुंखे, संतोष धोबी, पप्पू जोशी, शकील पटेल, आदिवासी सेनेचे हुसेन तडवी, शिवाजी नगरचे दगडू पाटील, निलेश पराशर,न्हावीचे सरपंच देवेंद्र चोपडे,नितीन इंगळे, हमीद पटेल, प्रमोद तळेले,अजहर खाटीक, इमियास शेख, कपिल शेख मन्यार, पिंटू कुंभार, विजू कुंभार, सुरेश कुंभार, योगेश राजपूत पाटील, योगेश चौधरी, प्रल्हाद बारी, पंकज बारी, कडू पाटील, प्रवीण लोणारी,न्हावीचे चेतन इंगळे, विलास चौधरी, प्रकाश वाघ,सारंग बेहेडे,संतोष वाघ,आर के चौधरी, विरावलीचे संजय मोतीराम पाटील, विजय कवडीवाले आदी शहरातील व तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.