भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स येथील पानटपरी दुकान फोडून दुकानातून चांदीचा शिक्का, सिगारेट पाकिट, रोकड आणि इतर साहित्य असा एकुण १० हजार रूपये किंमतीचा मद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ६ जून रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ७ जून रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील सुहास नगरातील रहिवाशी असलेले पंकज शिवाजी जगदाळे वय ४५ हे पानटपरी चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे भुसावळातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स येथे पान टपरी आहे. ५ ते ६ जून दरम्यान त्यांची पानटपरी बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी पानटपरी दुकानाचे कूलूप तोडून दुकानातून चांदीचा शिक्का, सिगारेट पाकिट, रोकड आणि इतर साहित्य असा एकुण १० हजार रूपये किंमतीचा मद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी ६ जून रोजी सकाळी ९ वाजता समोर आला. याप्रकरणी शनिवारी ७ जून रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीसठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजस परिसकर हे करीत आहे.