भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीत बांधकामाच्या ठिकाणाहून लोखंडी प्लेटा, आसारी, ईलेक्ट्रीक पोलचे तुकडे असा एकुण २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे ९ जून रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी १० जून रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामचरण झिपा तंवर वय ४२ रा. व्हीआयपी कॉलनी, भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी ९ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराच्या समोर ठेवण्यात आलेले बांधकामाचे साहित्य यात लोखंडी प्लेटा, आसारी, ईलेक्ट्रीक पोलचे तुकडे असा एकुण २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धााव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण धनगर हे करीत आहे.